बोचणारा काटा

बोचणारा काटा आपण कुरवाळत बसत नाही, तो मुळासकट काढायचा असतो आणि आपण तो उपटून काढतोच.
तेव्हाच त्याची वेदना संपते. मात्र हा नियम सर्वत्र लागू नाही होत.
बोचणार दुःख मात्र आपण अगदी मनापासून कुरवाळतो, त्याला दूर करताना कमालीचे असह्य असतो.त्याला दूर करताना होणाऱ्या वेदनेची कल्पनाही अस्वस्तच करते.
कधी कधी वाटते त्या दुःखाच्या वेदनेत स्वतःला गुरफटून ठेवण्यातच आपली धन्यता मानणारे कमी नाहीत.
कारण त्यातून बाहेर पडायच नसते. अगतीकपणे स्वतःच आपल्या जपलेल्या जखमेवरची खपली काढून फुंकर मानायची सवय झालेली असते. ती बहुदा मोडायची नसते.
मेंदूला आणि मनाला त्याची गुंगी चढलेली असते. त्या नशेत झिंगायचं व्यसन नकळत जडलेलं असते. त्या धुंदीतून बाहेर पडण अशक्य नसते असं नाही, पण तस करायचं नसते. दुःख असते निसटलेल्या सुखाचं. दुःखाची पारायणं म्हणजे त्या निसटलेल्या सुखाची काल्पनिक आवर्तनं. त्यात डुंबायला मन सारखं वाहवत राहते.
बोचऱ्या थंडीत तब्बेत बिघडतेच, कारण तो सुखावणारा गारवा नसतो. कडाक्याच्या थंडीच्या माऱ्यात गारठून मृत्यूच ओढवतो, थंड हवेच्या झुळकीचा शहारा मिळत नसतो.
मन घट्ट करून या दुःखाच्या धुक्यातून स्वतःच बाहेर पडायचं असते. मनावरच मळभ आपणच दूर करायचं बोचणाऱ्या काट्या परी…

Advertisements