…+ मान

स्वाभिमान, अभिमान, दुराभिमान, वृथाभिमान आणि अहंकार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
या विविध मानात असणारा आणि समोरचा त्यांना पाहणारा यांच्यात गल्लत सहज होवू शकते.
कारण एकच ज्याचा त्याचा दृष्टीकोन.
अभिमान, दुराभिमान आणि फुटकळ असा वृथाभिमान प्रकर्षाने जाणवून येतात. त्यात टोकाची भूमिका असते.
स्वःताच्या सत्वाच अस्तित्व जपणं आणि अहंकाराला गोंजारण यात जमीन आसमानचा फरक आहे. अनेकदा हा फरक क्षितिजाच्या रेषेसारखा भासमान असतो. तो नेमका कुठे संपतो आणि कुठे सुरु होतो हे कळणे खूप कठीण. मग सुरु होतो समज गैरसमजांचा हिंदोळा. ज्याच्या हेल्काव्यात नात्यांचा समतोल हरवून जातो.

रखडलेले- कारणमीमांसा

अनेकदा लग्नाचं अमुक एक वय गेलं की लोकं रखडलेल्या प्रकारात मोडतात.
का? या अशा उशिरापर्यंत लग्न न होण्याची काय करणे असावीत.
त्याचीच एक सूची बनवावी असा विचार आला आणि कारणे शोधा मोहीम सुरु झाली.
खूपच रोचक पण खरी कारणे सापडली. अर्थात ती इथे मांडणे ओघाने आलेच.

आकडा

तीच्या किंवा त्याच्या वयाचा वाढता आकडा पाहता आई बापाला अनेकदा आकडी येते.

विसंगत सुसंगत

विसंगत प्रश्नांची सुसंगत उत्तरे विसंगतच असतात.

ती आडवी गेली

आज पुन्हा त्याला उठायला उशीर झाला. रात्री उशिरापर्यंत नेटाने नेटवर वेळ घालवायचा नाहीतर मोबाइल वर खेळायचं किंवा चाटायचं (chat करायचं). मग सकाळी जाग येणार कशी?
तसं हे रोजचं आहे. पण आज जास्तच उशीर झाला. त्यातून आज एक महत्वाची क्लाएन्ट मिटिंग आणि अप्रेझल अनाऊन्समेंट होणार होती. सगळं सुरळीत झालं तर संध्याकाळी देवासमोर वाटीभर साखर ठेवावी , आई ठेवते तशी असा विचारही आला. घडाळयाचा धावता काटा बघून तो पण पळायला लागला. सोबत त्रागा आणि चिडचिड. लकी शर्ट चं नेमकं बटन तुटलेलं. आज कोणाचा चेहरा बघून दिवसाची सुरुवात केली असा प्रश्न पडला. किचन मध्ये जाताना बायकोला पाहिलेलं पलंगावर आडव पडून पण त्या आधी बेड वर पहडून समोरच्या आरशात स्वतः चं दर्शन केलेलं सहज रित्या विसरला तो. आता बायकोला फर्मान हातातली कामं बाजूला टाकून शर्टचं बटन लावण्याचं. उशीर झाला की नेमकं असा काही होतं कि खोळंबा होतोच. विश्वाचा अबाधित नियमच आहे तो . लगबगीनं शूज घालताना लक्षात आल की पॉलीश करायचं आहे. आता अजून ५ मिनटे जाणार. स्पाईडर म्यान च्या वेगाने जणू तो जिना उतरला.
तेव्हड्यात ती आडवी गेली आणि त्याला स्पीड ब्रेकर लागला. डोक्यात झिनझिणी आली. त्याने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तिच्या त्या काळ्या केसाळ कातडीला ती नजर जाणवली . ती हि त्याच्याकडे तिचे करडे डोळे रोखून गुरगुरून घुश्यात बघू लागली. काय सांगाव , तीही तिच्या कुणा महत्वाच्या कामाला जात असावी आणि तो मनुष्य तीच्या वाटेत आडवा आला. पण तीने चपळतेने त्याला तिचा रस्ता काटू दिला नाही. गेल्या वेळेला ती आडवी गेली त्या दिवशी एक क्लाएन्ट गेला होता त्याचा . आता चार पाऊले मागे यायला त्याचं तन तयार नव्हते. समोर मोर्निंग वाल्क करणाऱ्यांपैकी कुणी पहिल तर, सोसायटी मध्यल्या कुणी बघितलं तर… या अपशकुनाने त्याच्या मनात चर झालं. आज किती महत्वाची काम व्हयाची होती आणि ती आडवी गेली . मन अधिकच खट्टू झालं, मनीमाऊने याच्या मनाचा आता पूर्ण ताबा घेतला.
समोरच्या रस्त्यावर तशीही रिक्शा मिळत नाही लवकर , पण आज त्याचं बिल त्या काळ्या मांजरावर.
ब्रिज वरून फलाटावरून हवी असलेली ट्रेन जाताना पाहिली, चढायला न मिळालेल्या त्या ट्रेन चं खापर त्या काळ्या मांजरावर.
नेहमीचा बूट पोलिश वाला नव्हता आज , त्याचं तिथं नसण्याच पातक काळ्या मांजरावर.
मिटिंग झाली खरी पण डील साईन नाही झाली, त्यासाठी पुन्हा नंतर अजून एक मिटिंग स्केड्यूल करावी लागणार होती. पुन्हा त्याच्या डोक्यात तीच घोळू लागली .
लंच ब्रेक नंतर होणारं अप्रेझल अनाऊन्समेंट उद्या व्हाव असं त्याला वाटू लागलं , आणि जेवताना कचकन मिरची चावली गेली,कारण अर्थातच ती. संबंद दिवस त्या मनी ने त्याच्या मनाचा ताबा घेतलेला. लक्ष होतं कुठे जेवणात.
तेव्हड्यात कुणी सांगितलं, बॉस ला अचानक मीटिंग आल्याने अप्रेझल अनाऊन्समेंट होणार नाही.
नशीब तितकं वाईट नाही असच वाटलं त्याला. सुटकेचा निः श्वास टाकला राव त्याने.
पण दोन तासातच अप्रेझल लेटर टेबलावर ठेवलं असिसटन्त म्यनेजरने.छातीत धस्स झालं. ती आठवली.
लेटर उघडलं, इतरांप्रमाणेच पगार वाढ मनासारखी नव्ह्ती. पण प्रमोशन झालं. पदोन्नती होती पण पगार वाढ खुरटलेली. अपेक्षेप्रमाणे… पण तरीही या कमी वाढलेल्या पगाराची जवाबदारी आज तिची होती.
घरी आल्यावर बायको ला सांगितल्यावर तिने मात्र देव जवळ दिवा लावताना एक वाटी साखर ठेवली. तेव्हा वाटलं बायको असावी तर अशी. सगळ्यात गोड मानणारी.
रात्री जेवण तसं गेलच नाही त्याला, मनात सकाळची काजळी अजून होती.
झोपताना उगीच वाटलं त्याला, काय झालं असतं चार पाऊल मागे गेलो असतो.
किवां मीच घाईत चालायला नको होतो, ती दिसली असती आधीच वाटेत तर मीच थोडं धावलो असतो वेगात. आजचं हे सगळं जे मनासारखं नाही झालं याला कारण ती आडवी गेली.

बोचणारा काटा

बोचणारा काटा आपण कुरवाळत बसत नाही, तो मुळासकट काढायचा असतो आणि आपण तो उपटून काढतोच.
तेव्हाच त्याची वेदना संपते. मात्र हा नियम सर्वत्र लागू नाही होत.
बोचणार दुःख मात्र आपण अगदी मनापासून कुरवाळतो, त्याला दूर करताना कमालीचे असह्य असतो.त्याला दूर करताना होणाऱ्या वेदनेची कल्पनाही अस्वस्तच करते.
कधी कधी वाटते त्या दुःखाच्या वेदनेत स्वतःला गुरफटून ठेवण्यातच आपली धन्यता मानणारे कमी नाहीत.
कारण त्यातून बाहेर पडायच नसते. अगतीकपणे स्वतःच आपल्या जपलेल्या जखमेवरची खपली काढून फुंकर मानायची सवय झालेली असते. ती बहुदा मोडायची नसते.
मेंदूला आणि मनाला त्याची गुंगी चढलेली असते. त्या नशेत झिंगायचं व्यसन नकळत जडलेलं असते. त्या धुंदीतून बाहेर पडण अशक्य नसते असं नाही, पण तस करायचं नसते. दुःख असते निसटलेल्या सुखाचं. दुःखाची पारायणं म्हणजे त्या निसटलेल्या सुखाची काल्पनिक आवर्तनं. त्यात डुंबायला मन सारखं वाहवत राहते.
बोचऱ्या थंडीत तब्बेत बिघडतेच, कारण तो सुखावणारा गारवा नसतो. कडाक्याच्या थंडीच्या माऱ्यात गारठून मृत्यूच ओढवतो, थंड हवेच्या झुळकीचा शहारा मिळत नसतो.
मन घट्ट करून या दुःखाच्या धुक्यातून स्वतःच बाहेर पडायचं असते. मनावरच मळभ आपणच दूर करायचं बोचणाऱ्या काट्या परी…

जीव निर्जीवातला

असं होतच सगळ्यांच्या बाबतीत…
किती तरी गोष्टींमध्ये जीव गुंतून जातो. पेन, कंपास पेटी, तीच ती बसायची खुर्ची, एखादा मनापासून आवडलेला लकी शर्ट, डायरी, पाणी पिण्यासाठी तोच तो स्वतःचा स्वतंत्र ग्लास, रेडिओ, जुनी खेळणी, वगैरे . अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये आपला जीव आपल्या नकळत अडकून जातो. अशी वस्तू हरवली, तुटली, बिघडली किंवा त्या वस्तुचं काही बर-वाईट झालं की मात्र मनही हळवं होतं. ती वस्तू गेल्याचं दुःख अनेकदा अनावर होतं. अश्रूही असतात साथीला. काहीतरी विपरीत घडलं , जीवनात नसती पोकळी झाल्याचा भाव निर्माण होतो.
अनेक वर्ष होवूनही ती वस्तू सोबत नसल्याची जाणीव असते. त्या वस्तूवरील प्रेमाचे न विरहाचे किस्से अनेकदा लोकांना सांगतो. ती वस्तू आठवण म्हणून मनात कायमची घर करून गेलेली असते. कधी काळी जीवापाड जपलेली ती वस्तू आपल्याबरोबर नाही, याची खंत राहतेच.
का? कशासाठी?
अशा वस्तूंवर इतकं प्रेम?
हाडा-मासाच्या माणसांवरही असा लोभ जडत नाही अनेकदा. जीवंत माणसे, आसपास असताना दुःखाचे कारण बनतात अनेकदा . दुखावले जातो आपण अनेकदा .
निर्जीव वस्तुंच बरं असते, त्या आपल्याला तसा त्रास देत नाहीत, त्यांच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात. आपल्याला हव तस त्यांना वापरता येते, ठेवता येते .
म्हणून कदाचित त्या सतत हव्या हव्याशा वाटतात. त्यांची साथ- सोबत हवीशी वाटते.
गंमत आहे न? विचार केला तर आपला जीव अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये कितींदा अडकलाय याची एक यादी नक्की बनेल.

जीवन मरण – एका भिंतीपलीकडले

मुंबईत तस कोणतही लोकल रेल्वे स्टेशन पाहता इथल्या जगण्याच्या वेगाचा अंदाज सहज येतो. त्यातली गर्दी, रोजची धावपळ, तीच ती वरदळ, गडबड ,गप्पा, आवाजाचा कान्हेर, तिकडेच पोटापाण्यासाठी हातात काहीनाकाही विकणारे , ट्रेन मध्ये चढण्या – उतरण्याची कसरत , घाई , सतत कुठेतरी पोहचायचं असतं हि भावना, एकूणच जगण्यासाठीचा आटापिटा. मग ते मोठं junction असो किवा एका फलाटाच स्टेशन, जगण्याची केविलवाणी हि उठाठेव दोन्हीकडे सारखीच.
पण आजचं हे एक फलाटाच स्टेशन थोडं वेगळं भासलं. इथल्या रेल्वे रुळाला लागुनच एक स्मशान आहे. मोठं स्मशान . मधेच जुनं बांधकाम असलेली थोडी मुघल सारखी वास्तु ,बाजूला पांढऱ्या फुलांनी डवरलेलं एक मोठं झाड , आणि मधेच पसरलेलं आणखी एक मोठ हिरवागार,असं दुसरं झाड . खूप थडगी असावीत.
पण तरीही शांत , निचापित पडलेलं , या स्टेशनच्या कोलाहलापासून एकदम वेगळं.
तिथं दफन केलेली ती सगळी लोक कधीतरी या फलाटावरची एक होती. इथल्या वर्दळीतली, जगण्याची आसक्ती असलेली, तिकडे मात्र सगळं संपलेली. या रेल्वेरुळाला लागून असलेली भिंत त्या स्मशानाला वेगळं करत होती. इथल्या गर्दीतून एक भिंत पार केली कि जगण्यातून मृत्यूपर्यंतचं अंतर संपलेलं. मधूनच एक फास्ट ट्रेन भरदाव निघून गेली. किती विसंगत?
समोरच्या जगण्याच्या बेदरकार वेगात ते मरण मागे तसच शांत, स्तब्ध,निशब्ध, निर्विकार-एका भिंतीपलीकडले

बातमी आक्रोशाची

सकाळी सकाळी तसाही TV पहायचा वेळ नसतोच. पण आज घरात TV चालू होता आणि त्यावर बातम्यांची वाहिनी.
राशिभविष्य , शुभ सकाळ , TOP २० -५० झटपट बातम्या किंवा ब्रेंकिंग न्यूज असं काहीस सकाळच्या बातम्यांचं स्वरूप असते .
आजची hilighted बातमी क्लेशकारी होती. तशा बहुतांश बातम्या मानसिक त्रासच देतात पण आजची बातमी मनस्ताप करून देणारी .
भारतीय सरहद्दीवर एका शूर कर्नलने आपल्या प्राणांची आहुती दिली.शहीद संतोष महाडिक यांची शोर्य गाथा आणि त्यांचं पार्थिव त्यांच्या गावात दाखल. पण त्यानंतर चे त्या बातमीचे ते live broadcast असह्य झालं .
त्या पार्थिवा समोर धायमोकलून रडणारे चेहरे बघून सुन्न झालं मन. त्यांचा तो आक्रोश , ती शोकाकुल अवस्था बातमी बनू शकते?
का? कशासाठी ? खरच गरज असते का त्याची? कुणाचं दुःखं असं शूट करून काय पोचवायच असतं या वाहिन्यांना ? कि असं भेदक, भकास स्वरूप दाखवलं तरच TRP वाढतो कि जनमानस कळवळून जागा होतो? नेमकं काय सांगायचं या बातम्यांना ?
भावनांचा बाजार नुसता.

आम्ही आधुनिक विचारांचे ?

आम्ही आधुनिक विचारांचे ? – भाग १

काळ बदलतोय, आणि सोबत आम्ही सुद्धा… त्या सोबत संकल्पना, विचार, संस्कृती, वागणूक सगळच.
शिक्षण, जागतिकीकरण, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, विचारांची मोकळीक, आणि तत्सम खूप कारणे.
आता मग काय… आम्ही सुधारक किंवा सुधारलेले, पुरोगामी विचारांचे, आम्ही सुशिक्षित, स्वतंत्र विचारांचे, पुढारलेले, forward, आम्ही हे, आम्ही ते…
आमचा देश… भारत देश… जिथल्या सभ्यतेचे, संस्कारांचे, संस्कृतीचे गोडवे गाता आमची मान अभिमानाने अनेकदा उंचावते. कधी कधी जुन्या रीती- भातींना आमचा विरोध असतो, पण तो सुद्धा आमच्या सोयीनुसार.त्या बद्दल सविस्तर विश्लेषण करूच पुढे वेगवेगळ्या भागात…