आम्ही आधुनिक विचारांचे ?

आम्ही आधुनिक विचारांचे ? – भाग १

काळ बदलतोय, आणि सोबत आम्ही सुद्धा… त्या सोबत संकल्पना, विचार, संस्कृती, वागणूक सगळच.
शिक्षण, जागतिकीकरण, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, विचारांची मोकळीक, आणि तत्सम खूप कारणे.
आता मग काय… आम्ही सुधारक किंवा सुधारलेले, पुरोगामी विचारांचे, आम्ही सुशिक्षित, स्वतंत्र विचारांचे, पुढारलेले, forward, आम्ही हे, आम्ही ते…
आमचा देश… भारत देश… जिथल्या सभ्यतेचे, संस्कारांचे, संस्कृतीचे गोडवे गाता आमची मान अभिमानाने अनेकदा उंचावते. कधी कधी जुन्या रीती- भातींना आमचा विरोध असतो, पण तो सुद्धा आमच्या सोयीनुसार.त्या बद्दल सविस्तर विश्लेषण करूच पुढे वेगवेगळ्या भागात…

Advertisements

नावात काय असते ? भाग २

नावात काय असते ?- भाग २
तर…
आमच्या इथे नावाचं एक वेगळंच प्रस्थ आहे,
विशेषतः लग्नानंतर मुलीच्या माहेरच्या आडनावाला अंतर देण्याची प्रथा आहे.
पण आता एकदम जन्मानंतरची ओळख हद्दपार काही जणी नाही करत.
म्हणून माहेरचं नाव आडनाव तसच ठेवलं जाते आणि सासरच नाव ही त्यापुढे मोठ्या दिमाखात लावलं जाते .
त्यामुले नाव थोडं लांबतं पण माहेरची ओळख जवळ राहते असं काहीसं लोकांचं म्हणणे पडते.
हे असं लाम्बलेल नाव अनेकदा भारी प्रकरण असते, कधी चमत्कारिक तर कधी विनोदी तर कधी आणिक वेगळं.
म्हणजे नाव आणि दोन आडनावे वेगळा अर्थ देतात नावाला.
काही नमुनेदार उदाहरणं
सौ. मधुरा कडू-गोडसे (मधुरतेने कडू न होता गोडच राहायचं )
सौ. सौजन्या दाबके – धपके ( यमक जुळणारे शब्द )
सौ. अकल्पिता जामसडेकर – भातखंडेकर (नावाची आगगाडी)
सौ. तृप्ती दहिभाते – भेंडे (उत्तम मेनू आणि वर तृप्ती )
सौ. वसुन्धरा डोंगरे – पठारे (भौगोलिक नाव )
सौ. सुवर्णा तांबे -पितळे ( धातूयुक्त नाव )
सौ. पूजा भगत – साधू (श्रद्धाळू नाव)
सौ. योजना व्यवहारे – दलाल (व्यावहारिक नाव )
सौ. नेत्रा माने – पोटे (अवयव विशेष )
सौ. मीनाक्षी मोरे – लांडगे (प्राणी विशेष)
सौ. साक्षी चाचे -गुंड (गुन्हे जगताची साक्ष देणारी )
सौ. आनंदी नाचरे- हसरे ( नावातच खुशी )
सौ. भैरवी सरगम – तबले (नावात संगीत)
सौ. अबोली बोले – गुपचुपे (नेमकं काय बोलायचं )
सौ. समृद्धी साठे रिकामे (सासरी जावून रिते झाल्यासारखे )
हि यादी पुढेही update होतंच राहील. तुम्ही भर घातलीत तर स्वागत आहे. आनंद होईल.

कुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…

Image source: https://www.facebook.com/theprartinc
Image source:
https://www.facebook.com/theprartinc
त्याच्या दर्शनाची ओढ जीवाला नेहमीच वेड लावते.
तो तसाही सर्वत्र असतो, तरीही एका विशिष्ठ देवळात, मंडपात त्याला भेटण्याची तडफड का ?
त्याहूनही महत्वाचं म्हणजे अशा महात्म्य असणाऱ्या ठिकाणी असे दर्शनासाठी तडफडणारे मोठ्या संख्येने धडपडत असतात.
अशा धडपडणऱ्या लोकांना कार्यकर्ते हडतुड करतात, शिवाय अलोट गर्दीची धक्काबुक्की बोनस असतेच.
इतकं सगळं सोसून, तासान तास रांगेत उभं राहून दोन क्षण शांतपणे दर्शन मिळेल, तर तेही नाही.
मग पदरी येते मनाची चडफड.
दर्शनाचं समाधान दूरच पण बाकी मनस्ताप जास्त.
VIP दर्शनाची आस या जीवाला लागते , मग सुरु होतो खेळ ओळखीचा …जितकी ओळख मोठी , तितकी रांग छोटी …
नेमकं काय साध्य करू पाहतोय, घरचा देव कमी महत्त्वाचा का ? की त्याच्या कृपेची प्रचीती येतच नाही ? म्हणून हे अस सगळं का ?
कुठेही करेन मी धावाधाव, पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…
गणित सगळं स्वतचं. स्वतःसाठीचं. काय म्हणायच याला ? स्वार्थ की परमार्थ ?
वेगवेगळ्या धर्मानुसार, जातीनुसार, संप्रदायानुसार, वेगवेगळ्या नावांनुसार, ठिकाणानुसार, स्त्रीलिंगी -पुल्लिंगी असा फरक तर आपण करतोच .
आणि आता मंडळ , देवळं यानुसार पण आम्ही त्याला किती महत्व द्यायचं ते ठरवतो. नेमकं कुठे चाचपडतोय ? नेमकं कुठे चाललोय आपण ? दर्शनाला ? की फक्त देखाव्याचा काळाकुट्ट नाला ?

मन की ग्रह ?

मनं जुळली की ग्रह जुळतात,
ग्रह जुळले की मनं जुळतातच, असं नाही.

बस..

Arrange marriage हे बस थांब्यावर बसची वाट पाहण्यासारखे असते. अनेकदा आपल्याला हवी असणाऱ्या बसची किती तरी तास वाट पहावी लागते.
काहीना थांब्यावर थांबावच लागत नाही, आल्याआल्याच पहिल्या बस मध्ये काही चढतात, तर काहींना थोडा वेळ वाट पाहावी लागते.
कधी कधी कुणी ओळखीचं taxi किवा गाडीतून हाथ दाखवून लिफ्ट देतो , म्हणजे थोडसं उशिरा पण नशिबात असलेल्या love marriage सारखे.
काही जण हे बस थांब्यावर येण्याचं कटाक्षाने टाळतात , कारण उनकी मंझिल पाने का जरिया त्यांनी निवडलेला असतो, त्यांना गंतव्य स्थानी नेमक कसं जायचं हे पक्क ठावूक असते . कोणतं वाहन, कोणता रस्ता ,कधी, केव्हा , कसं सगळं ठरलेलं.किंवा आपसूक जमून आलेल्या love marriage सारख. काही मात्र बस थांब्यावरच अडकून बसतात. काहींची दुरवस्था अशी कि नेमकी बस कोणती पकडायची हेही कळत नाही कारण नेमकं पोहचायचं कुठे हे ही माहित नसते.
काही चुकीच्याच बस थांब्यावर थांबून असतात, जिथे जायचय तिथे जाणारी बस तिथे येणारच नसते. हे बहुतेक एकतर्फी प्रेम करणाऱ्यांच आणि इच्छा-अपेक्षांचे इमले बांधणाऱ्याचं होत असावे. त्यांना बहुदा बस सापडतच नाही. कुणाला विचारून योग्य रस्ता धरणारे लोक पण असतात. काही चुकीच्याच बस मध्ये चढतात , पुन्हा उतरतात , पुन्हा नवीन बस पकडतात , कसे बसे आपल्या इस्पित स्थळी पोहचतात. संसाराचा डाव पुन्हा मांडणाऱ्या लोकांप्रमाणे. काही बसची वाट बघून कंटाळून पर्यायी मार्ग अवलंबतात.
पण ज्यांना बस सापडत नाही असे मात्र हाताच्या बोटावर मोजता येणारे …