विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥

image source prartinc.com

तो कडेवर हाथ ठेवून विठेवर उभा राहणारा, त्या तिथे….चन्द्रभागेतीरी…
पण मनाला का एक अदभूत आकर्षण आपल्या राहत्या जागी वाटत राहतं?
त्याच्या नामात एक सूर झालेला वारकरी पाहिला कि त्याचा भाव अचानक मनी उमटतो.
तिथे त्याचा दर्शन कधी होईल तेव्हा होईल, पण अंतरात आत कुठेतरी तो सर्व व्यापून राहिलाय हेच खरं…

Advertisements

तिसरा

सामान्यतः दोन व्यक्तींचा गप्पा-टप्पा कार्यक्रम रंगत येतो तेह्वा ते अनेकदा तिसऱ्या बद्दल बोलत असतात आणि म्हणूनच कदाचित बोलण्याला बहर आलेला असतो. बौद्धिक, तत्ववादी, किवा सामाजिक चर्चा तितक्या चवीने घडत नाहीत, कारण त्यात मानवी स्वभाव कुणा तिसऱ्याचा उद्धार करत नसतो, आणि जिथे अशी संधी मिळाली कि चर्चा करणारे ती सोडतही नाहीत.

अपेक्षा

कधी कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका, हि सुद्धा एक अपेक्षाच.नाही का?
अनपेक्षित राहणे हि पण एक अपेक्षाच, इतका साधं गणित लक्षात येवू नये.
म्हणे, अपेक्षा नसल्या कि अपेक्षाभंगाचं दुःख होत नाही, पण अपेक्षारहित असल्यानेही सुखशिंपण होत नाही.

नातेवाईक आणि नातं…

नातेवाईक असणे आणि नातं असणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
नात्यातला ओलावा आणि उब हि जन्माला आल्यापासून चिकटलेल्या खंडीभर नातेवाईकांमध्ये असतेच असं नाही.
अनेकदा मनाचे बंध जोडले गेले कि त्यातून निर्माण झालेलं नातं खूप काही देवून जाते.

लाडू कधी देणार?

काही प्रश्न काही प्रश्नांना संलग्न असतात.लग्न प्रकरणी तर असे अनेक प्रश्न हातात हात घालून समोर येतात, आणि नंतर हात धुवून मागेच लागतात.
समोरच्याच्या लेखी उपवर मुलगा किंवा मुलगी समोर आली कि ती व्यक्ती प्रश्न विचारते (चांभार चौकश्या करते), याला विचारपूस म्हणतात. ‘शिक्षण झालं ? , ‘कामधंद्याची माहिती’ झालंच तर अगोचरपणे ‘तरी साधारण किती पगार आहे ?’इथवर सवाल जवाब कार्यक्रम आटोपला कि पुढे लोकं diabetic होतात आणि त्यांची गोडाची इच्छा प्रबळपणे जोर धरू लागते अन शेवटी हक्काने लोक लाडू मागतातच.
कधी कुतूहलाने ,कधी माहितीपोटी, कधी काहीही विचारायचं म्हणून , कधी मस्करीने , कधी काळजीने तर कधी खोचकपणे ‘लाडू कधी देणार ?’हा प्रश्न सर्रास विचारला जातो.
का ? कशासाठी ?
आणि या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर अपेक्षित असतं समोरच्याला ? का लोकांना दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसायची जणू सवयच असते ? वरकरणी जाणवत नसल्या तरी काही गोष्टी खाजगी so called personal असू शकतात इतका सोप्पा विचार मनात येत नाही.
बर , हा प्रश्न कोणीही विचारू शकतं , दूरच्या नात्यातले काका किवा राहत्या सोसायटी मधल्या वरच्या मजल्यावरचे आजोबा , just ओळखीच्या मावशी , किवां रस्त्यात अचानक भेटलेल्या शाळेतल्या बाई , किवा नुकताच लग्न करून settle झालेला मित्र किवां मैत्रीण . प्रश्न विचारणारे कुणीही असू शकतात, हे लोक कुठेही गाठून हा प्रश्न विचारतत अगदी चारचौघात सुद्धा.
विचारणारी तोंड वेगळी , रूपं वेगळी , भाव वेगळा , स्वर वेगळा , काळ ,स्थळ तेही बदलणारे
पण प्रश्न मात्र तोच. अनुत्तरीत

लग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते?

अमुक त्याचं लग्न लवकर झालं किंवा तमक्याचं लग्न उशीरा झालं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमका कोणता निकष लावला जातो? वय ?
लग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते? संविधानाने कायद्यात तरतूद केलेले? वैद्यकीय भाषेत आरोग्यशास्त्र ठरवते ते?
कि समाजाने ठरवलेले ?
कुणी तरी आवडलं आणि आता आयुष्यभराची साथ हक्काने त्याचं व्यक्तीने द्यावी यासाठीचे प्रयोजन म्हणजे लग्न वेळ? कि आसपासचे समवयस्क लग्न करू लागले कि समजावे, आता लग्न करायला पाहिजे.