कामगार दिनाच्या निम्मिताने…

labour-day_LOW

आज सुट्टीचा दिवस .१ मे म्हणजे जागतिक कामगार दिवस. शुक्रवार असल्यामुळे तीन दिवसांची सलग सुट्टी मिळाली. आज सुस्तीतच दिवसाची सुरुवात झाली. दुपारच्या जेवणांनंतर लॅपटॉप टाईमपास म्हणून हातात घेतला. साहजिकच गूगलचं पेज ओपन केलं. आज गुगल नाव वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं दिसलं. गुगलचे स्पेलिंग छान सिम्बोलीक रेखाटले होते. आपसूकच त्यावर क्लिक केलं. आणि डोक्यातही एक विचार क्लिक झाला.

त्या एका क्लिक सरशी Labour Day चा wikipedia पासून  movie पर्यंत सगळाच या दिवसाचा इतिहास सुस्पष्ट झाला. जगभर हा दिवस साजरा होतो. काही देशात तारीख वेगळी असते , पण हि संकल्पना सर्वश्रुत आहे, जगाने स्वीकारली आहे पण, खरच त्याचा अर्थ उमगला आहे का? कारण अनेकदा  विशिष्ठ दिवस साजरा करण्याचं प्रयोजन न कळताच तो दिवस साजरा करण्याचं प्रस्थ वाढलंय, हा भाग वेगळा. असो. विषयांतर नको.
भारतात आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात जागतिक कामगारदिवसा बरोबर महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा होतो,त्याचा संदर्भ वेगळा. मराठी लोकशाहीची मागणी प्रत्यक्षात आणण्यासाठी जागतिक कामगार दिन निवडला गेला. महाराष्ट्र निर्मितीसाठी इथल्या कामगार -शेतकरी  वर्गाची चळवळ डावे पक्ष, डावे विचारवंत, साहित्यिक आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली केली गेली. तो संयोग झालाच.
जगभर हा दिवस साजरा केला जातो, पण त्यामागे दिवसातून आठ तास काम हा चळवळीचा मुळ मुद्दा होता. ८ hrs working day हि कल्पना अजूनही काल्पनिक वाटते याची खंत वाटते. कारण
दिवसातून आठ तास काम हि संकल्पना नेमकी कुठे आणि कशी राबवली जाते हा प्रश्न उद्भवतो. कामगार म्हणजे नेमकं कोण? त्याची व्याख्या करायची झाली तर कशी मांडणार ? कोणे एके काळी गिरणीत घाम गाळणारा कामगार, माथाडी कामगार, कोळशाच्या खाणीत आयुष्य काजळवणारा, अंग मेहनतीचा काम करणारा, ओझी उचलणारा, कुण्या कारखान्यात मोठ्या संख्येने श्रम करणारा , प्रसंगी जीव धोक्यात घालून गगनचुंबी इमारतीची काच साफ करणारा, so called प्रतिष्ठित न समजली  जाणारी कामं करणारा श्रमजीवी वर्ग?
कि वातानकुलीत ऑफिसमधे कॉम्पुटर समोर, कधी कॉन्फरन्स रूम मध्ये , rat race मध्ये पदोपदी तग धरून ठेवणारा बुद्धीजीवी वर्ग? कामगार व्याख्येत या लोकांची वर्णी लागत नाही का? हा वादाचा मुद्दा असू शकतो . पण जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर हा वर्ग सुद्धा शोषित कामगारच आहे. अनेकदा १४-१८ तास कॉम्पुटर आणि फायलींमध्ये हरवून गेलेला हा वर्ग assignment, आवड, passion, बिग प्रोजेक्ट, डेडलाईन, बॉसची आज्ञा , कमीटमेंट वगैरे वगैरे गोंडस नावे देवून आपापला टास्क पूर्ण करत असतो. AC च्या थंड तडाख्यात कामाचा व्याप बघून हे लोक तिथेच गार पडतात. इंग्रजीत म्हणतात ना  freeze होणे , त्याची प्रचीती इथेच येते, गारठून गोठलेले हे लोक ऑफीसमधेच पडून असतात. ‘कामा’ने ‘गार’ पडलेल्या  ‘कामगार’ वर्गाचा आज विचार करणे क्रमप्राप्त आहे, नाही का? या लोकांची  व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याची सरमिसळ होते कारण यांचं वेळेचं गणित पुरतं चुकलेलं असते.
नुकताच म्हणजे २८ एप्रिलला world day for safety and health at work साजरा झाला. हा दिवस का साजरा केला जातो याचा अर्थ समजवून घेताना खूप गल्लत होते.  International Labour Organization (ILO) मुळे हा दिवस २००३ पासून साजरा होतो. पण ज्या निकषांवर आणि मुद्द्यांवर हा दिन ठरवला गेलाय ते सगळं धाब्यावर बसवलं गेलंय. Safefty आणि healthy environment मध्ये स्वच्छता,आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, विमा या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या रीतसर विसरल्या जातात . कामाच्याजागी mental health म्हणजेच काम करण्यासाठी योग्य मानसिकता असण्यासाठीचे अनुकूल वातावरण, आणि त्या अनुषंगाने तत्सम बाबींचा विचार हरवतोय.
काम  करण्यासाठी जगातील  सर्वोत्तम शहरे किवा देश कोणते? किवां काम करण्यासाठी टॉप शंभर कंपन्या कोणत्या ? असं जेव्हा वाचायला मिळते तेव्हा मनात असूया निर्माण होते कि आपण तिथे नाही.
कदाचित The grass is always greener on the other side या उक्ती प्रमाणे चकाकते ते सोने नसते याचा अनुभव कदाचित तिथे प्रत्यक्षात काम करून येवू शकतो.
शेवटी हक्क, अधिकार, कायदे, सुव्यवस्था, आदर्श व्यवस्थापन आदी गोष्टींचे धडे कितीही गिरवले तरी ते प्रत्यक्षात ते अंधारात असल्याने त्यावर प्रकाश पडावा , वर्षातून एक दिवस तरी त्याची जाणीव व्हावी यासाठी कामगार दिन साजरा व्हावा यापेक्षा दुसरी खंत ती काय असणार. सुखावह गोष्ट म्हणजे निदान १ दिवस तरी काम न करून गार होण्याचा प्रकारापासून  मिळणारी १ दिवसाची सुट्टी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s