पोटभर

चमचमीत, चटकदार , रुचकर, चविष्ठ, स्वादिष्ठ, पोषक , पौष्टिक, झटपट, खाव्वयांसाठी मेजवानी , पाककृतींचा खजिन आणि वगैरे वगैरे आपल्या परिचयाचे आहेतच;
पण याहीपेक्षा उदरभरण महत्वाचे.
भुकेलेल्या जेव्हा ‘पोटभर’ जेवण मिळतं तेव्हा ती तृप्तता नाही सांगता येणार.
मनासारखं आवडीचं जेवण ‘पोटभर’ जेवून आलेला ढेकर सगळं काही सांगून जातो .
इथे पाककौशल्ये आणि किचकट, कटकट्या पाककृती पेक्षा साध्या, सोप्प्या, basic खाण्याचे पदार्थ ही बाब समोर ठेवलीय.
अगदीच स्वयंपाकघर कशाशी खातात हे हि ज्यांना ठावूक नसते पण भुकेने व्याकूळ अशा लोकांनी ही स्वतः काहीतरी खाण्यायोग्य बनवून ‘पोटभर’ खावं.
कारण पोट भरणे हेच ‘पोटभर’च धेय्य. त्यातून बघू जिभेचे चोचले पुरवले गेले तर दुग्धशर्करा योग. त्यासाठी स्वयंपाक घरात खटाटोप करणं ओघाने आलंच.

Advertisements