घोडनवरी

‘घोडनवरी’ एक प्रतिक आहे समस्त अविवाहितांचं जे या ना त्या कारणामुळे विवाहित मंडळीत सामिल नाहीत.

कारणे, अडचणी, उहापोह, समाजव्यवस्था, लग्नसंस्था, कुटुंब पद्धती, इच्छा, अपेक्षा, मतभेत, जातपात एक ना अनेक असे बरेच मोठे मोठे शब्द अविवाहीतांकडे कसे पाहतात आणि हि मंडळी त्यांच्याकडे कशी पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न.

लग्न आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी वाट्याला येतात आणि त्या कधी कधी जाणतेपणी, कधी अजाणतेपणी, कधी मनापासून, कधी बळजबरीने, कधी आवड म्हणून, कधी निवड म्हणून, कधी अधिकाराने, कधी नाईलाजाने , कधी सहजपणे, कधी अपराधीपणे , कधी जवाबदारीने, कधी संतप्तपणे, कधी हौसेने, तर कधी दैवयोगाने म्हणून स्वीकारल्या जातात तर कधी झिडकारल्या जातात.
पण बहुदा मेख इथेच आहे… नकळतपणे लग्न हि एक जटील समस्या बनून जाते आणि जिथे समस्या तिथे भेडसावणारे प्रश्न, त्यांची उत्तरे, उपाय, त्रास, मनस्ताप,गंमत, विक्षिप्त विनोद आणि बरयाच गोष्टी त्या अनुषंगाने मागोमाग येतातच.

त्याचाच मागोवा म्हणजे ‘घोडनवरी’.

Advertisements