ओळखी -अनोळखी

ओळखतो म्हणजे  नेमका काय  रे भाऊ?  आणि एखाद्याला ओळखून असणं म्हणजे आणखीन काहीतरी वेगळ असते.
अनेक वर्ष एकमेकांशेजारी बसून काम करणारे अनोळखी असू शकतात. ट्रेन मध्ये बस मध्ये प्रवास करताना बाजूला बसलेला अनोळखी सहप्रवासी  अगदी सहजपणे मन मोकळ करतात. पुढच्या स्टेशनला उतरून निघून जाणारा त्याच्या आयुष्याची गोष्ट सहज सांगून जातो.
एकाच बाकावर बसून शाळा कॉलेज मध्ये अनेक वर्ष काढल्यानंतर एकमेकांना जिवश्चकंठश्च म्हणून मैत्रीचे दाखले देणारे अनेकवर्षांनंतर भेटल्यावर अनोळखी भासू शकतात किंवा तितकेच जिवाचे वाटू शकतात. वेगवेगळ्या शहरात राहूनही आपुलकीचे बंध जोडणारेही आहेत.
पण रोजची ती सहजाता कुठे तरी कधी कधी हरवल्यासारखी वाटते. अनेकदा रोज रोज भेटणारे, नकळतपणे तथाकथित व्यक्तिगत आयुष्यातलं एकमेकांना खूप काही सांगणारे, देणारे आवर्जून एकमेकांवर हक्काने जजमेण्ट करणारे, अनेकदा एकत्रपणे फिरायला जाणारे, जगभरातल्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणारे ते दोघे कोण असावेत ? ओळखीचे? मित्र ? कि सोबतीला असतात म्हणून सोबत करणारे? वरकरणी हे मैत्रीच्या नात्यात बसू शकतात पण खरंच ते खऱ्या अर्थाने मित्र असतात ?
जस्ट फ्रेण्ड , फ्रेण्ड आणि बेस्ट फ्रेण्ड यात रेषा असतेच. पण तरीही नेमक आपण, आपली ओळख, परिचय, मैत्री कि घट्ट मैत्री यातला फरक जाणवतोच कि.
जीवाला जीव देणारे, अनेक वर्ष मनाने जवळ असणारे, वेळ प्रसंगी आधार म्हणून खंबीर मागे उभे राहणारे अचानक एखाद्या घटनेने अनोळखी होतातही. मैत्रीचे घट्ट विणलेले धागे उसवतात, विरून जातात. मागमूस हि राहत नाही अनेकदा.
आधी जे गुंतलेल असते ते खूप खोल आत तुटून गेलेला असते. नेमका काई होता काळात नाही. एकमेकांना समजून घेणारी समज राहतच नाही.
हे अस प्रत्येक नात्यात होतच कि माहिती, प्रेम ल, लग्न किंवा कोणत्याही नात्याचा गुंता हा असा गुम्फलाच जातोच.
जर समोरच्याला आपण नीट ओळखतो, समजतो तर मग समजून का घेता येत नाही? समाज गैरसमज, वाद विसंवाद, मानापमान , अपेक्षा आणि अपेक्षाभंग च्या गर्तेत नात्यांचा गुंत्यातल्या गाठी अजूनच घट्ट होतात कधीही न सुटण्यासाठी.

Advertisements

तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड 

तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड
अतुल कहाते
पहिली आवृत्ती १६ मार्च २०१४
प्रकाशक –मनोविकास प्रकाशन,  पुणे

१५९ पानांच्या या पुस्तकात इंटरनेटच्या जाळ्यात आपण अडकलो आहोत याची प्रचिती वाचणाऱ्याला आल्यावाचून राहत नाही. या भीषण वास्तवाचे चटके प्रत्येक पानागणिक अधिकच त्रास देतात. आपल्याच नकळत आपण एका विचित्र सापळ्यात नकळत अडकल्याची भावना मनाला त्रास देते.
इन्टरनेट, मोबाइल, आधुनिक गॅजेट्स यामध्ये आपल जगण्याच चक्र वेगवान होता होता दिशाहीन तर होत नाही आहे ना हा प्रश्न सतत पडतो. अनेक पुस्तकांचे, लेखकांचे, तत्ववेत्यांचे, संशोधनाचे दाखले देत प्रत्येक वेळी हेच दाखवून दिलय कि आता धोक्याची घंटा वाजतेय. आपला मेंदू, आपल्या सवयी या सगळ्यांना कशा प्रतिसाद देतात आणि त्यात होणारे बदल हे घातकच असतात हा एक सूर त्यातून दिसत आहे. वाचनाची संपलेली संस्कृती किती घातक आहे याचे हि संदर्भ येतात.
माणूस हा सतत बदलतो, प्रगती करतो. अश्मयुगातील जगणं आता जगू शकतो का? तसाच ज्या गोष्टी आपण शेकडो वर्ष करतोय किंवा डिजिटल आक्रमणाने ज्या गोष्टी करतोय त्या पैकी नवी गोष्ट फक्त घातकच, अस का? कोणतीही गोष्ट चांगले वाईट परिणाम घेऊनच येते. डिजिटल क्रांती हे पण त्यापैकीच एक. त्याचे दुष्परिणामच या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतात. लेखकाचा कल तंत्रणाच्या ओव्हरलोड वाईटरित्या कसा परिणाम करतोय हे सांगण्याकडे आहे.
पण लेखकाचा विषयाचा पक्का अभ्यास, त्याने दिलेले दाखले आपल्याला विचार करायला भाग पडतात. आपण वापरात असणारा इन्टरनेट आपल्या मेंदूवर करत असलेला परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर मोठे परिणाम करत असतो. अनेकदा ते किती वाईट किती चांगले यावर जगभरात अनेक संशोधन होत आहे याची माहिती यातून मिळते. ते सतत आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपल्या सवयी , किंवा इन्टरनेट, मोबाइलला नेमका कसा वापरावा याचा विचार करण्याची गरज आहे. काही सवयी बदलणं खरंच निकडचं आहे. पुस्तकातून आपण आपला मेंदू कसा जपावा, कसा वापरावा यावर अमूल्य मार्गदर्शन केलय. वेळ आहे आताच सुधरा आणि नेमका कस तेही सांगितलंय. जे जे ऑनलाईन असतात त्यांनी जगताना योग्य लाईन वर येताना काय करावं हे हि कळते . भीषण अवस्था आहे खरी पण सरतेशेवटी इन्टरनेट किंवा मोबाइलला चा वापर आपल्या हातात आहे. आपण या सर्वांच्या स्वतःला हातातला खेळणं होऊ द्याचा कि नाही हे आपण ठरवायचं.
मस्ट रीड बुक.

download

पॅटर्न

अनेकदा काही माणसं काही गोष्टी करतात बहुदा त्या मागे ते एक बिहेव्हीअरल पॅटर्न फॉलो करतात. चुकीचं? बरोबर? तार्किक ? अतार्किक ? मूर्ख सारखे किंवा अति शहाण्यासारखे ? आणि बरेच काही

पॅटर्न – प्रश्न

काही प्रश्न लोक विचारतातच का? कदाचित हा प्रश्न पण त्याच प्रश्नांपैकी

एखाद्या झोपलेल्या माणसाला घरातून विचारतात का रे झोपल्यास का? कळस म्हणजे तो झोपलेला माणूस झोपल्या झोपल्या डोळे मिटून उत्तरही अगदी मान हलवून किंवा तोंडाने हूं किंवा चक्क हो म्हणून उत्तर देतो.
अनेकदा जेवत असलेल्या माणसाला का रे जेवतोस का रे ?  सकाळी कामाला बॅग आणि टिफिन घेऊन जाणाऱ्याला पाहून विचारतात कामाला जातोस का? किंवा  गणवेशातील मुलं टिफिन, पाण्याची बॅग घेऊन, पायात बूट घालून निघालेले असताना काही शेजारी विचारतात काय रे शाळेत चाललास का? अरे काय कमाल आहे ? खात्री करून घ्यायची असते का प्रश्न विचारणाऱ्याला ? कदाचित हा प्रश्न पण त्याच प्रश्नांपैकी.

आता घोडनवारीचा ब्लॉग आहे तेव्हा या संदर्भात पण प्रश्नांची मांदियाळी खूप असते. रोज शेजारी राहणाऱ्याला दर काही दिवसांनी विचारायच काही जमलय का ? अरे जमलं तर पत्रिका देणार नाही का? अरे काय उत्तर अपेक्षित असते? कदाचित हा प्रश्न पण त्याच प्रश्नांपैकी

पॅटर्न – कळ

लिफ्ट साठी वाट पाहत उभे असताना कित्येक जण बटण पुन्हा पुन्हा दाबतात. एकदा त्या बटनाची कळ दाबली तर तशीही ती लिफ्ट येणारच असते पण तरीही सतत प्रेस करून काय मिळते काही कळत नाही. बरं त्या लिफ्टच्या तंत्रज्ञानावर अविश्वास किंवा बटन नीट चालत नाही  किंवा सोसायटी तिचा नीट मेन्टनन्स करत नाही किंवा लिफ्ट मध्येच थांबेल आणि आपल्यापाशी येणारच नाही हि भीती म्हणून तिला सतत हाक मारावी. कुठून अली असेल हि वृत्ती ? थांबण्यासाठी उसंत नसते कदाचित तितका संयम नसतो म्हणून एक चाळा? ती लिफ्ट येणार नाही याची खात्री नसते? कि सतत साद देऊन आपल्याला हवी असणारी गोष्ट जशी आपल्या पाशी येत नाही याचेच अनुभव आयुष्याच्या वर खाली होणाच्या रोलरकोअस्टर राईड मध्ये जास्त अनुभवल्यामुळे असेल किंवा गोष्ट निसटून जाऊ नये म्हणून शेवट पर्यन्त सगळं खटाटोप करायची सवय लागलेली असते.
कदाचित त्याअनामिक कळकळीच्या सवयीमुळे आपल्याच नकळत बटनाची कळ दाबली जाते.

मार्मिक

काही गोष्टी सांगण्यासाठी संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागत नाही, मोठमोठ्या उताऱ्यांची पारायणे करावी लागत नाहीत, हेच खरे.

नाती / ना-अति / ना-ती

नातं कोणतही असो, एकदम आदर्श असं कधी असतं का?
ना देखावा, ना नाटकीपणा, ना खोटेपणा, सगळंच निस्वार्थी, समजुतदारीचं, सामंजस्याचं खर खुरं, ना रुसवे ना राग ना अपमान कि मान, संपूर्ण विश्वास, ना कोणत्या अपेक्षा… एक निखळ नातं… मैत्रीचं, प्रेमाचं,कोणतंही…
हे असं ideal नसावं कधीच. पण कधी कधी आपण नाती का सहन करतॊ ? माणूस एकटा जगू शकत नाही म्हणून? की त्या मागे त्याचा आणखी दुसरा हेतू असतो?
म्हणजे कधी कधी खेचावं लागतं, नको वाटत असताना पण काही गोष्टी करतो जवाबदारी म्हणून? कर्तव्य म्हणून? कि केलं पाहीजे म्हणून? लोक काय म्हणतील म्हणून?
त्याही पेक्षा आपली आत कितीही घुसमट झाली किंवा फरक पडेनासा झाला तरी ती नाती, ती माणसे आपल्या जगण्यात घेऊन ती वावरतो. ते आपण असतो की नाईलाज असतो ? कि तोडून मुक्त होण्याची हिम्मत नसते? कि तसं जमत नाही ?
ना ती नाती असती, ना अति असे प्रश्न असते.

जळातील मासा

जळातील मासा
जयवंत दळवी
पहिली आवृत्ती १ एप्रिल १९६१
साकेत आवृत्ती २०१४
प्रकाशक – साकेत प्रकाशन प्रा. लि., पुणे

१२० पानांच्या या पुस्तकात १२ कथांचा समावेश आहे.
मानवी मनाचे लहानातली लहान कंगोरे जयवंत दळवी यांनी अचूक रेखाटले आहेत.
कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांनी साहित्यात खूप योगदान दिलंय. कथा हि त्यांची मक्तेदारी. माणसाचे मन किती भलतच असते, कसलाही काठ न पकडणारे, खोल खोल गर्तेत बुडता बुडता सहजच तरुन जाणारे, आता काठावर येणार इतक्यात पुन्हा तिथेच गटांगळया मारणारे मन आणि त्याच्या विक्षिप्त तऱ्हा. मग ते प्रेम असो, राग, दुष्टपणा किंवा कामवासना.
त्यांच्या कथेतील पात्र मधूनच भेटतात, आपल्या आसपास असल्यासारखी वावरतात, आणि मग एखाद पात्र मनात घर करून जाते. विसंगत तरीही सुसंगत असा मानवी भाव-भावनांचा गुंता ते अचूक दाखवून देतात. कधी कधी आपण अंतर्मुख होतो, तर कधी बाहेर घडणाऱ्या गोष्टींना थोड्या वेगळ्या दृष्टीतून पाहतो. त्यांची लिखाणाची शैली त्यांना इतर लेखकांपासून आपसूकच वेगळ करते. अशा पद्धतीची पात्र निर्माण करून त्यांच्या विषय वासना अगदी चपलख पणे मांडताना कुठेही किळस नसतो. तुच्छता नसते. प्रकृती कि विकृती याचा संभ्रम पडावा इतक्या सहज भावनांचा आवेग लेखकाने मांडलाय. भावनांची आंदोलने झेलताना कुठेही कंटाळा येत नाही. या पुस्तकातल्या सगळ्याच कथांची सांगता काहीतरी देऊन जाते. प्रत्येक भावना वेगळी, त्याची तीव्रता वेगळी आणि त्याचा वाचकावर पडणारा प्रभाव पण वेगळा.
पहिली कथा ‘जळातील मासा’. मायकेल हे पात्र. मदर मेरी कडे कंफेस करताच प्रसन्न झालेल त्याच मन पुन्हा एकदा हुरहुरत, मिलिंदाच्या फक्त अस्तित्वाच्या जाणिवेने. वयाचा आणि जाणिवांचा तसा ताळमेळ नसतो हेच खरं.

‘अनोळखी’ ही दुसरी कथा. अप्पांच्या एकाकी आयुष्यात त्यांची मुलगी नंदिनी हाच आसरा. पण आज त्या अनोळखी बाईच्या शेजारी बसण्याने मनात कितीतरी दिवस दाबून ठेवलेल्या भावना पुन्हा डोकं वर काढू लागल्या. पण इष्ट-अनिष्टेच्या चौकटीत अडकलेल मन च् -च् -च् च्या पलीकडे जात नसतं .

तिसरी कथा म्हणजे ‘व्यथा’. अनुराधा आणि गोवर्धन जुन्या आठवणी गोंजारता गोंजारता विलक्षण आवेगातही त्याच्यात एक अनोळखी विरक्ती कुठून येत असेल हा प्रश्न पडतही नाही हे विशेष.

‘मंगू’ हि चौथी कथा. इयत्ता दुसरीत असणारा मंगू त्याच्या छोट्या बहिणीशी असा छद्मी पणे किती निरागसतेने वागतो असेच म्हणावे लागेल. खाणातल्या पदार्थासाठीपण जीवाची किती तगमग होते, स्वातंत्र्याची चटक उपजतच असते, दुसऱ्याला खिजवण्यात समाधान मानाण्याची विकृती असलेली मानवी मनाची एक बाजू इथे पुन्हा स्पष्ट होते.

‘अनामिकाची क्षणचित्रे’ या पाचव्या कथेत मनाची कुरूपता देहाच्या कुरुपतेपेक्षा जास्त भयानक असते हे सांगते . शारीरिक गरज आणि पांढर पेशा समाजाने एकूण दिलेली नीती-अनीतीची खोटी जाचक जोखडं वाहणारा एखादया दुर्बल जीवाची त्यात कुचंबणा ही होतेच होते.

सहावी कथा ‘स्मृतिशेष’. भूतकाळाच्या स्मृती कधीही पाठ सोडत नसतात हेच सांगतात. माणिक आणि निखिलेश ची घालमेल, बोलण्यात नकळत आलेलं अवघडलेपण शब्दांना अधिकच प्रभावी बनवते. जुन्या संबंधांचा ताण नव्या संवादात येतो तेव्हा काळ आणि माणसे बदलतात याला पुष्टी मिळते.

सातवी कथा ‘इंद्रायणी’. मानवी संशय, अपराधीपण, त्रागा, हुंदके, अगतिकता, तिरस्कार, सुटकेची मोकळीकता, आणि दुःखाची परिसीमा याचा कोलाहल इथे वाचायला मिळतो. देविदास आणि इंद्रायणीच्या संसाराची फरफट दैवी आघाताने कि मानवी संशयकल्लोळाने होते, की वेळेचा ताळमेळ चुकतो ? दोष कुणाचा? प्रश्न निरुत्तरितच राहतात.

‘जगन’ या आठव्या कथेत शाळकरी जगनच भावनाविश्व रेखाटलंय. माणूस जन्मतःच स्वार्थी असतो, स्वतःच्या प्रसिद्धीच्या, मोठेपणाच्या मागे, मत्सराच्या वाटेने तो काहीही करू शकतो. मग ते कृत्य छोट असो वा मोठं , दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळता याव यासाठी आटापिटा चालतो, मग स्वतःची मानहानी, नालस्ती झाली तरी फरक कुठे पडतो.

नववी कथा ‘कळ्या आणि पाकळ्या’. पुष्पाच्या उमलत्या वयातल्या सुकुमार कोमल भावना विदारक वास्तवतेने भंग होतात. कल्पनेच्या आरश्यात चितारलेल्या प्रतिमेमागे खर रूप भकास आणि विद्रुप असते याच भान म्हणजेच प्रौढत्व.

‘गोपी’ या दहाव्या कथेत अनेकांच्या मनातली अस्वस्थता, भीती, वैफल्य, स्वतःवरचा अविश्वास सगळंच गोपी पात्रात एकवटल आहे. समोरून आलेला घास भूक असूनही हातात जोर नाही म्हणून खाता येत नाही याच शल्य विचार करण्यास भाग पडते.

‘ससा’ हि अकरावी कथा. थोडीशी फँटसी वाटावी अशी. त्याला ती शेवटपर्यत ओळख न पटलेली, ती मात्र “ओळखलस का ?” अस विचारून बेधडक, बिनधास्त संवाद साधणारी. ट्रेन च्या दोन स्टेशन मधल्या त्या प्रवासात खूप काही विशेष नाही घडत पण जे घडत त्याचा मेळ शेवट पर्यंत नाही लागत.

‘अनारसा’ या शेवटच्या कथेत माणसाची चूक आणि त्याचे भोग नेमके कसे मनात भीती आणि अपराधीपणाची भावनेला जन्म देतात याच चित्रण आहे. कर्म कसे आणि कधी फळ देईल याची कल्पना कोणालाच नसते, पण चूक दुसऱ्याची अस म्हंटलं तरी आपण केलेल्या चुका आपलं मन शेवटपर्यत खात राहतात. अप्पा हे पात्र त्याचाच उदाहरण.

वाचायला हवच असं नाही, पण मानवी मनाच्या गुंत्यात एकदा डोकवायला भाग पडणारं नक्कीच आहे.

jalatil-masa-original-ghodnavari

धागे

सरळ असलेले धागे हळू हळू एकमेकांत गुंफता गुंफता त्यांची वीण किती मोहक दिसते. स्वतःचं अस्तित्व विसरून एकमेकांना पूरक होऊन तो गोफ घट्ट होतो.जणू ते एकमेकांसाठीच आहेत. त्यांचा रंग, पोत, त्याची जाडी रुंदी सगळंच वेगळ असून किती मस्त असतात एकत्र.
नकळत कधी ते धागे सैल होतात आणि उसवून अगदी अलगद वेगळे होतात.मोकळे होतात. पण कधी अचानक त्यांचा गुंता होतो. हे अगदी तिच्या आणि त्याच्या नात्यासारखं.
घट्ट बसलेल्या गाठी बाहेरून सोडवता सोडवता अधिकच घट्ट होतात. आतून सोडवण्याच्या पलीकडल्या असतात. तेव्हा त्यांना एका झटक्यानिशी तोडणंच सोप्पं असते.
त्रास दोन्हीकडे होतोच.
पुन्हा नव्याने कधी गुंफण होतं तर कधी तो गुंता नको म्हणून ते धागे पुन्हा एकत्र येतच नाहीत. समानंतर राहणं किती सोप्पं असते?
कधी मग नव्या धाग्याशी बांधणं होतं तर कधी तसंच एकतारी राहणं.

जगायला जमलं राव!

आयुष्यात उलथापालथ झाली , वाईट अनुभवांची संख्या जास्त झाली , दुःखाची जरा अधिक तीव्रतेने जाणीव होऊ लागली, म्हणजे मनासारखं ना होता उलट घडू लागलं की माणूस तत्वज्ञान बोलू लागतो. मग त्याला अनेकदा अध्यात्माची गोडी लागते . त्याला मग कधी spiritual science म्हणतो , कधी कर्म, कधी जीवनाचं मर्म तर कधी नुसतंच नशीब अशी labels लावतो . थोडक्यात काय, दुःखाची कारणे शोधतो, असा का घडलं याचा शोध घेतो आणि उत्तरं नाही सापडली की अनाकलनीय तर्क लावून त्याला label लावतो. आणि मग यालाच जीवन ऐसे नाव , अनुभव समृद्धता वगैरे गोंडस वर्णन करून life goes on अस म्हणत आपल रहाट गाड खेचत राहतो . ते हसत, गात, नाचून जमलं तर जगायला जमलं राव अस म्हणायचं का?